August 3, 2024 8:06 PM

views 22

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली निघाले आहेत. याअंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालयानं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस आहे.

August 2, 2024 7:48 PM

views 26

नीट-यूजी परीक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण

नीट-यूजी परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार होऊन परीक्षेच्या शुचितेला धक्का लागल्याचं दाखवणारा कोणताही पुरावा नसल्यामुळे ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या निर्णयामागची कारणं सांगणारा तपशीलवार निकाल न्यायालयानं आज जाहीर केला. या परीक्षा घेण्यासंदर्भात वारंवार बदलणाऱ्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयानं आज राष्ट्रीय परीक्षा संस्थेवर ताशेरे ओढले. परीक्षार्थींना केंद्र बदलण्याची, चुकीच्या पद्धतीनं नवीन नोंदणी करण्याची परवानगी देणं, चुकीची प्रश्नपत्र...

July 29, 2024 6:59 PM

views 13

आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज अजित पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना नोटीस बजावली आहे. शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही अशाच प्रकारची याचिका सादर केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालय एकाचवेळी निर्णय घेणार आहे. या नोटीशीला उत्तर आल्यानंतर याचिका सुनावणीसाठी घ्यायच्या किंवा नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे.

July 27, 2024 8:01 PM

views 14

विशेष लोक अदालत सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं आवाहन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विशेष लोक अदालत सप्ताहामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन केलं आहे. हा सप्ताह २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यात मालमत्ताविषयक वाद, नोकरी, कामगारांच्या समस्या, जमीन अधिग्रहण मोबदला, अपघात प्रकरणातील दावे सर्वोच्च न्यायालयाच्या या विशेष लोक अदालत सप्ताहात निकाली काढले जातील. दुर्गम भागात राहणाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी होता येईल, असे न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी सांगितले.

July 24, 2024 1:08 PM

views 22

सर्वोच्च न्यायालयातर्फे २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन

सर्वोच्च न्यायालय २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान विशेष लोक अदालतीचं आयोजन करणार आहे. त्यात प्रलंबित खटले मार्गी लावणं, सामंजस्यानं तोडगा काढणं याला प्राधान्य दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाचं आयोजन होतंय. सर्वोच्च न्यायालयात खटले प्रलंबित असणाऱ्या याचिकाकर्त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं आहे.

July 24, 2024 10:07 AM

views 16

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून स्वागत

नीट परीक्षेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केलं असून, शेवटी सत्याचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेला त्रुटीमुक्त संस्था बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, नीट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, असंही प्रधान यांनी स्पष्ट केलं. एनटीएच्या संपूर्ण सुधारणेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीनं तज्ज्ञांची मतं जाणून घेतली आहेत आणि विविध पद्धतींचा अभ्यास केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते ...

July 23, 2024 6:07 PM

views 14

नीट – युजी २०२४ परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पेपर फुटी आणि गैरप्रकार या कारणांमुळं नीट - युजी २०२४ ही परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यंत्रणेतल्या त्रुटीमुळे पेपर फुटले असल्याचा कुठलाही पुरावा नाही. पुनर्परीक्षा घेतली तर २३ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होईल आणि शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होईल, असं न्यायालयानं सांगितलं.

July 22, 2024 8:22 PM

views 23

कावड यात्रा मार्गावरच्या, खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

कावड यात्रा मार्गावरच्या, खाद्यगृहांच्या मालकांनी दुकानाच्या पाटीवर स्वतःचं नाव लिहिण्याच्या, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली.  हे निर्देश धार्मिक भेदभाव करणारे असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, आणि इतर संस्था तसंच व्यक्तींनी या निर्देशांविरुद्ध याचिका दाखल केल्या होत्या. अशा प्रकारचे निर्देश देण्याच्या अधिकाराबाबतही याचिकाकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर न्यायमूर्ती हृषीकेश रॉय आणि न्यायमूर्ती एस व्ही एन...

July 22, 2024 2:45 PM

views 7

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं २०२१ साली झालेल्या हिंसाचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र आशीष मिश्रा याला दिल्ली किंवा लखनौ च्या बाहेर जायला मज्जाव करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने याप्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. 

July 19, 2024 9:53 AM

views 21

नीट-यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

नीट युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल,उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर कालपासून सुरु झाली, त्यावेळी न्यायालयानं हे निर्देश दिले.   एनटीएने शहर आणि परीक्षा केंद्राच्या तपशिलासह, परीक्षार्थींची ओळख कोणत्याही प्रकारे न दड...