September 2, 2024 8:20 PM

views 15

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरणासाठी समिती स्थापन

सर्वोच्च न्यायालयानं शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरण करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या नेतृत्वाखाली आज एक समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवडाभरात पहिली बैठक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठानं दिले आहेत.   शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण करू नये, समितीने टप्प्याटप्प्याने त्यावर विचार करावा,  पर्यायी ठिकाणी शेतकरी शांततापूर्ण आंदोलन...

August 27, 2024 1:28 PM

views 9

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलाची आज पहिली बैठक

वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव असतील. दलाच्या इतर सदस्यांमध्ये केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष, सर्जन, व्हॉईस ॲडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक यांचा समावेश आहे. कोलकात्यातल्या राधागोविंद कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका महिला निवासी डॉक्टरवर लैंगिक अत्याचा...

August 23, 2024 10:12 AM

views 17

सर्वोच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे

दिल्लीतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी तसंच निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं संप मागे घेतला असल्याची घोषणा केली आहे. यात, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजसह दिल्लीतील केंद्रसरकारच्या रुग्णालयांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयानं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटेनेनं संप मागे घेत असल्याचं सांगितलं आहे. कोलकातामधील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात घडलेल्या घटनेची गंभीर दखल तसंच...

August 22, 2024 3:26 PM

views 17

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय आणि कोलकाता पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर

कोलकाता इथल्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयलामधील निवासी डॉक्टरवर कथित बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआयनं आणि कोलकाता पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर स्थिती अहवाल सादर केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी आंदोलक डॉक्टरांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं आहे. या आंदोलनाचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्यासाठी...

August 21, 2024 9:43 AM

views 26

कोलकाता बलात्कार प्रकरण : पीडित महिलेचे समाज माध्यमावरील नाव, छायाचित्र काढावेत – सर्वोच्च न्यायालय

कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल पीडित महिला संदर्भातील नाव , छायाचित्र आणि व्हीडियो तत्काळ काढून टाकण्यात यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना के...

August 20, 2024 6:58 PM

views 13

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना

देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने आज दिले. या कृती दलात देशभरातल्या निवडक डॉक्टरांचा समावेश असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल याबद्दल ते सल्ला देतील. कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची  सुनावणी करताना  सरन्यायाधीश ...

August 13, 2024 4:50 PM

views 15

पतंजलीवरील अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायलयाकडून बंद

योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्या विरुद्धचा अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायलयाने बंद केला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजली उद्योगाने न्यायलयात दाखल केलेला माफीनामा आणि वृत्तपत्रांमार्फत प्रसिद्ध केलेली जाहीर माफी याचना न्यायालयाने स्वीकारली आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती एहसानउद्दीन अमानुल्ला यांच्या पीठासमोर या खटल्याची सुनावणी झाली होती. यापुढे कायद्याचं उल्लंघन करु नये आणि न्यायलयात दिलेल्या वचनपत्राचं पालन करावं...

August 12, 2024 1:39 PM

views 16

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. येत्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले ९ लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठाने ही याचिका फेटाळली.

August 9, 2024 8:21 PM

views 9

नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ही परीक्षा येत्या रविवारी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेकरता अनेक उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरवरची किंवा अतिशय गैरसोयीची केंद्र मिळाली असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. परंतु, या कारणासाठी सुमारे दोन लाख परीक्षार्थींचं भविष्य पणाला लावता येणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती म...

August 6, 2024 7:24 PM

views 19

खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

मुंबईतल्या खासगी महाविद्यालयातला हिजाब आणि बुरखा बंदीचा नियम कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली. मुंबईतल्या चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाब आणि बुरख्यावर बंदी घालण्याचा महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय २६ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल...