December 19, 2025 8:08 PM December 19, 2025 8:08 PM

views 7

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

राज्यातल्या २९ महानगरपालिकांमध्ये महायुती म्हणून लढायची आपली तयारी आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मांडली.    तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत निवडणूक लढायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यांचे समन्वयक, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांबरोबर झालेल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं...

November 5, 2024 8:05 PM November 5, 2024 8:05 PM

views 12

अपक्ष उमेदवारांबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू – सुनील तटकरे

महायुतीच्या जागावाटपानंतरही अपक्ष म्हणून काही उमेदवार उभे राहिले असून त्याबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.   भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेला मिळाला आहे.

August 14, 2024 10:37 AM August 14, 2024 10:37 AM

views 12

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ‘संविधान वाचन’ उपक्रम साजरा करणार – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं स्वातंत्र्य दिनी 'संविधान वाचन' उपक्रम पक्षाच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तर अन्य जिल्ह्यांमध्ये पक्षाचे वरीष्ठ नेते, मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करतील असंही त्यांनी सांगितलं.

June 17, 2024 6:38 PM June 17, 2024 6:38 PM

views 11

सुनील तटकरे उद्यापासून विधानसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उद्यापासून राज्याच्या विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून हा दौरा सुरु होईल. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकारणी आणि आमदारांच्या बैठकीत तटकरे यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. या दोन दिवसांच्या दौऱ्यात तटकरे अहमदनगर शहर, अहमदनगर दक्षिण ग्रामीण, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.