March 7, 2025 9:57 AM March 7, 2025 9:57 AM
15
भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीचं पुनरागमन
भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री, मालदीव आणि बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या फीफा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून खेळणार असल्याचं अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कुवेतबरोबर झालेल्या सामन्यानंतर छेत्रीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता तो भारतीय संघात पुनरागमन करत आहे. येत्या १९ मार्चला शिलॉन्गमध्ये भारताचा सामना मालदीवबरोबर मैत्रीपूर्ण सामना होईल. त्यानंतर बांग्लादेशबरोबर साखळी सामनाही होणार आहे.