November 24, 2025 7:32 PM November 24, 2025 7:32 PM
डीफॉलिंपिक क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारात भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य पदक
जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या, डीफॉलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रांजली प्रशांत धुमाळनं महिलांच्या २५ मीटर पिस्टल नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. याआधी तिनं मिश्र पिस्टल नेमबाजीत अभिनव देश्वाल सोबत सुवर्ण पदक, तर महिलांच्या एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. पुरुषांच्या ९७ किलो फ्री स्टाईल कुस्तीत सुमीत दाहियानं सुवर्ण पदक पटकावलं, तर ८६ किलो फ्री स्टाईल कुस्तीत अमितनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २६ सुवर्ण, ९ ...