June 3, 2025 10:29 AM June 3, 2025 10:29 AM
14
उन्हाळी पिकांच्या पेरणीत लक्षणीय वाढ
देशभरात उन्हाळी पिकांच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. साधारणपणे 84 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.१५ लाख हेक्टरने अधिक आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भाताच्या लगावडीच्या क्षेत्रात जवळपास पाच लाख हेक्टरची वाढ झाल्याचे तसंच हरभरा डाळ, उडीद, श्रीधान्य, तेलबिया तसंच मका आणि भुईमूग यांच्या पेरणी क्षेत्रातही लक्षणीय वृद्धी झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे.