January 5, 2025 2:01 PM

views 9

टेनिसपटू सुमीत नागल एएसबी टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत दाखल

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्याने आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या, भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडचा सँडर एरेंड्स आणि ब्रिटनचा ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे.

January 4, 2025 2:49 PM

views 15

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लीचारोवचा १-६, ६-३, ६-१ असा पराभव

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लीचारोवचा १-६, ६-३, ६-१ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत त्याची गाठ फ्रान्सच्या एड्रियन मॅनेरिनो याच्याशी पडणार आहे.

October 20, 2024 1:48 PM

views 17

टेनिस : स्विझ इनडोअर टूर्नामेंटमध्ये भारताच्या सुमित नागलकडून अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझचा पराभव

टेनिसमध्ये स्विझ इनडोअर टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या पात्रता फेरीत काल झालेल्या सामन्यात भारताच्या सुमित नागल याने अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाझ अकॉस्टा याचा ५-७, ७-६, ७-७ असा पराभव केला. दुसऱ्या पात्रता फेरीत सुमितचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याच्याशी होणार आहे.    दरम्यान, पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा युकी भाम्बरी आणि त्याचा जोडीदार फ्रान्सचा अल्बानो ओलिवेट्टी यांचा सामना ब्रिटनचा जो सॅलीसबरी आणि नेदरलँडचा जीन जुलियन रोजर या जोडीशी होणार आहे.

August 27, 2024 12:18 PM

views 19

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सुमित नागल पहिल्याच फेरीत बाहेर

 अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरीत भारताचा महत्त्वाचा खेळाडू सुमित नागलला टेलॉन ग्रिकस्पोरनं पहिल्याच सामन्यात पराभूत केलं आहे. टेलॉननं त्याला १-६,३-६,६-७ असा पराभव केला. भारताच्या आशा आता रोहन बोपन्ना, युकी भांबरी आणि एन.श्रीराम बालाजी याच्यावर टिकून आहेत.

July 18, 2024 8:39 PM

views 21

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेतून भारताचा सुमित नागल बाहेर

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला आज सरळ सेट्समधे पराभूत झाल्यानं स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या मारियानो नावोननं त्याला ६-४, ६-२ असं पराभूत केलं. त्याआधी पुरुष दुहेरीतही त्याला त्याचा पोलीश जोडीदार कॅरोल ड्रझेविकी यांना पराभव पत्करावा लागला. फ्रान्सच्या अलेक्झांडर म्युलर आणि लुका वॅन हॅशे या जोडीनं त्यांच्यावर ६-३, ६-४ अशी सरळ सेट्समधे मात केली.

July 18, 2024 3:35 PM

views 15

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सुमित नागलचा अर्जेंटिनाच्या मारियानो नॅव्होनशी लढत

स्विडीश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना आज अर्जेंटिनाच्या मरियानो नवोने याच्याशी होणार आहे.स्विडनच्या बस्ताद टेनिस स्टेडियमच्या सेंटर कोर्टमध्ये आज दुपारी हा सामना होईल. त्याआधी मंगळवारी झालेल्या सामन्यात सुमित नागलने स्विडनच्या एलियास यमेर याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.  

July 17, 2024 10:06 AM

views 14

टेनिसपटू सुमित नागलची स्वीडीश ओपनमध्ये आगेकूच

टेनिसपटू सुमित नागलनं स्वीडीश ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनच्या इलिस येमेरचा सहा - चार, सहा - तीन, असा पराभव केला. या विजयानंतर सुमित एटीपी क्रमवारीत आतापर्यंतच्या सर्वोत्तम अशा ६८ व्या स्थानी पोहचला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे.   दरम्यान, या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी जोडीला फ्रान्सच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.  

July 16, 2024 12:25 PM

views 23

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलची स्वीडनच्या एलियास यमरशी लढत

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीच्या फेरीत भारताच्या सुमित नागलची लढत स्वीडनच्या एलियास यमरशी होणार आहे, तर पुरुष दुहेरीच्या लढतीत आज संध्याकाळी सुमित नागल आणि पोलंडच्या कॅरोल ड्रझेविकी या जोडीचा सामना फ्रान्सच्या अलेक्झांड्रे म्युलर आणि लुका व्हॅन अशे या जोडीशी होईल. भारतीय टेनिसपटू सुमितनं या मोसमात हेलब्रॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजरसह दोन विजेतेपदं जिंकली आहेत.

July 3, 2024 2:40 PM

views 29

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : भारताचे रोहन बोपण्णा, सुमित नागल पुरुष दुहेरीचे सामने खेळणार

लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एबडेन यांचा सामना आज संध्याकाळी जिओव्हानी मपेत्शी पेरिकार्ड आणि ॲड्रिन मॅनरिनो यांच्याशी होणार आहे. तसंच, भारताच्या सुमित नागल आणि सर्बियाचा दुसान लाजोविच यांची लढत देखील आज संध्याकाळी पेद्रो मार्टिनेझ आणि जॉमे मुनार या स्पॅनिश जोडीशी होणार आहे.    विम्बल्डन स्पर्धेतल्या याआधीच्या सामन्यात पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत द्वितीय मानांकित नोव्हाक जोकोविचने चेक प्रजासत्ताकच्या विट कोप्रिव्ह...

June 23, 2024 3:08 PM

views 29

टेनिसपटू सुमीत नागलचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चित

टेनिसपटू सुमीत नागल यानं आगामी २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. या हंगामात सुमितनं हेलबॉन चॅलेंजर आणि चेन्नई चॅलेंजर स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुमीत दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला होता. रोहन बोपण्णा आणि एन. श्रीराम बालाजी ही जोडीही पुरुष दुहेरीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.