October 28, 2025 2:52 PM October 28, 2025 2:52 PM

views 25

जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलनं पटकावलं सुवर्णपदक

सर्बिया इथं काल झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलने पुरुषांच्या ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने विजेतेपदाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या खेळाडूचा १०-० असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला कुस्ती संघानं पाच कांस्य आणि दोन रौप्य पदके जिंकली असून सांघिक विजेतेपदही पटकवले आहे.