September 6, 2024 7:56 PM September 6, 2024 7:56 PM

views 13

माजी राज्यसभा खासदार सुजीत कुमार यांचा भाजपामध्ये प्रवेश

बीजू जनता दलाचे माजी राज्यसभा खासदार सुजीत कुमार यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. तत्पूर्वी सुजीत कुमार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तो स्वीकारला. दरम्यान, बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी सुजीत कुमार यांना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी पक्षातून काढून टाकलं.