August 28, 2024 3:38 PM August 28, 2024 3:38 PM

views 5

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

  ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.  काल पुण्यात निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. नाटक, चित्रपट, मालिका या सर्व क्षेत्रात आपल्या समर्थ अभिनयानं त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांनी वयाच्या ११व्या वर्षापासून कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. बेबंदशाही या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. माहेरचा आहेर’, मानाचं कुंकू, कथा, आज झाले मुक्त मी, आईशप्पथ, चिरंजीव...