January 1, 2025 10:01 AM January 1, 2025 10:01 AM
5
ऊस गाळप हंगामात शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे साखर आयुक्तांचे निर्देश
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची; मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यंदाच्या गाळप हंगामात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुण्यातील साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. कार्यकारी संचालक आणि खाजगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत दक्षता घ्यावी असं त्यांनी सांगितलं. ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक विश्वास देशमुख यांनी क...