November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 31

यंदा ३५० लाख मेट्रिक टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज

यंदाच्या ऊस गाळप हंगामात ३५० लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा आरंभीचा शिलकी साठा ५० लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत साखरेचा खप २९० लाख मेट्रिक टन आहे. तर ३५ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल. तरीसुद्धा ७५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यांतर्गत उत्पादनात यंदा महाराष्ट्रात १२५ लाख मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात ११० लाख मेट्रिक टन आणि कर्नाटकात ७० लाख मेट्रिक टन इतकं सर्वाधिक उत्प...

April 7, 2025 9:07 AM April 7, 2025 9:07 AM

views 4

राज्यात ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन

राज्यात मार्च अखेरच्या ऊस गाळप हंगामाच्या अहवालानुसार, ८० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झालं आहे. एकूण २०० पैकी १८९ कारखान्यांची धुराडी ऊस संपल्यानं बंद झाली असून, सध्या केवळ ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात २७ पूर्णांक ६८ लाख मेट्रिक टन घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. साखरेचं ९२ ते १०४ लाख मेट्रिक टन उत्पादन हाती येण्याची अपेक्षा असल्याचं पुणे साखर आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे.