April 29, 2025 10:33 AM April 29, 2025 10:33 AM
5
सुदिरमन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना इंडोनेशियाशी
चीनमध्ये शियामेन इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ सुदिरमन करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'ड' गटातील महत्त्वपूर्ण लढतीत आज भारताचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे. गेल्या रविवारी डेन्मार्ककडून १-४ असा पराभव पत्करावा लागल्यानं भारतीय संघाची वाटचाल सुरुवातीलाच कठोर झाली आहे. गटातील अव्वल दोन संघांनाच पुढील फेरीत प्रवेश मिळत असल्यानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आज इंडोनेशियावर विजय मिळवणं अत्यावश्यक आहे. सुदीरमन करंडक स्पर्धेत भारताने २०११ आणि २०१७ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत उपांत...