November 29, 2024 3:49 PM November 29, 2024 3:49 PM
16
ईव्हीएम विरोधात काँग्रेसने केलेले आरोप हास्यास्पद – मंत्री सुधीर मुनगंटीवार
ईव्हीएम विरोधात काँग्रेसने केलेले आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. देशभरात ईव्हीएमवर निवडणुका घेण्याचा निर्णय आणि ईव्हीएमची खरेदी काँग्रेसच्या कार्यकाळात करण्यात आली होती. तसंच आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी, देशभरात विविध निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या,सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यास,काँग्रेस याबाबत गंभीर असल्याचं आम्ही समजू, असंही ते म्हणाले. दरम्यान, नवीन सरकारचा शपथविधी सोहळा लवकरच होणार असल्याचंही त्यांनी या...