October 4, 2025 7:57 PM October 4, 2025 7:57 PM
16
दक्षिण सुदानमध्ये पुरामुळे १९ जणांचा मृत्यू
दक्षिण सुदानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे २६ तालुक्यांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे साडेसहा लाख नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी व्यवहार समन्वय कार्यालयने दिली आहे. मुसळधार पावसामुळे सुमारे पावणेदोन लाख लोक विस्थापित झाले आहेत, पुरामुळे मलेरिया, अतिसार आणि श्वसन संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. किमान १२१ आरोग्य सुविधांवर परिणाम झाला आहे आणि कुपोषणाची तीन हजारांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. सेव्ह द चिल्ड्रनने इशारा दिला आहे...