December 6, 2025 8:13 PM December 6, 2025 8:13 PM
13
सुदानमध्ये बालवाडीवर झालेल्या हल्ल्यात ३३ बालकांसह ५० जणांचा मृत्यू
दक्षिण सुदानमध्ये सुदानच्या अर्धसैनिक दलांनी केलेल्या एका बालवाडीला लक्ष्य करून केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान ५० जण ठार झाले असून यात ३३ बालकांचा समावेश आहे. जखमींवर उपचार करणारं वैद्यकीय पथक मदतीसाठी घटनास्थळी पोचल्यावर दुसरा हल्ला झाल्यानं हे पथकही बाली पडलं. याच परिसरातल्या नागरी वस्तीवर देखील हल्ला करण्यात आला. इमर्जंसी लॉयर्स या मानवाधिकार संघटनेनं हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.