November 26, 2025 7:13 PM

views 44

ST कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची घोषणा!

शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही  समस्या असेल तर एसटीनं त्यांच्यासाठी  हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००- २२१- २५१ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी, तसंच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार आल्यास जितक्या दिवसाचं  शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार...

August 11, 2025 7:16 PM

views 17

विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस परवाना वाटप खुलं केल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्कूलबस परवाना वाटप खुलं केल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, असं सरनाईक म्हणाले. केंद्र सरकारनं स्कूलबस नियमावली तयार केली आहे. यानुसार १२ अधिक १ आसनव्यवस्था असलेल्या चारचाकीला स्कूलबसचा दर्जा दिला जाणार आहे. यात जीपीएस, अग्निशमन अलार्म यंत्रणा, सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन, वाहन ट्रॅकिंग, पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा समावेश केल...

June 6, 2025 4:58 PM

views 25

नीट परीक्षा येत्या ३ ऑगस्टला एकाच सत्रात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा मंडळाला ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात नीट प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. याआधी ही परीक्षा १५ जूनला होणार होती. मंडळानं ३ जून रोजी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करणं आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या पीठानं सुरुवातीला परीक्षा घेण्यासाठी मंडळानं मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र नंतर ३ ऑगस्ट रोजी नीट परी...

June 3, 2025 3:23 PM

views 15

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी मुदतवाढ

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ नोंदणीसाठी ५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली. ही मुदत ३ जूनला संपणार होती. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि  कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला. या निर्णयामुळे होण्याऱ्या बदलानुसार विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, २ जूनपर्यंत १० लाखांहून...

February 14, 2025 7:21 PM

views 22

दहावी, बारावी क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १० मार्च, २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवावेत.

October 9, 2024 2:09 PM

views 16

विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी, या उद्देशाने रिझर्व बँकेकडून शिष्यवृती योजना जाहीर

अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयांशी संबधित अध्यापक तसंच विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी या उद्देशाने रिझर्व बँकेने एक शिष्यवृती योजना जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था यांच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधले पूर्णवेळ अध्यापक यासाठी पात्र असतील. अर्थशास्त्र, बँकींग, क्षेत्रीय उलाढाली किंवा बँकेशी संबधित क्षेत्रात कमी कालावधीचा संशोधनासाठी त्यांना अर्ज करता येतील. सादर झालेले संशोधन प्रस्ताव, शैक्षणिक कार्य आणि मुलाखत यावर आधा...

July 1, 2024 3:42 PM

views 28

नीट फेरपरीक्षेचे निकाल जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने आज नीटच्या फेरपरीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेर परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली. एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  

June 29, 2024 3:17 PM

views 15

एनटीए च्या परीक्षा येत्या २१ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबर रोजी होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सी - एनटीएनं रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एनटीएनं काल जाहीर केलेल्या अधिसूचनेत यूजीसी- नेट जून २०२४ ची परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. संयुक्त CSIR-UGC-NET परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. ती आता २५ ते २७ जुलै दरम्यान घेण्यात येईल. एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम-ITEP मध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा ...