June 2, 2025 8:16 PM June 2, 2025 8:16 PM

views 3

येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या १५ तारखेला होणार असलेली NEET परीक्षा पुढं ढकलली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. अधिक परीक्षा केंद्रं आणि पायाभूत सुविधांची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढं ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.  

January 19, 2025 9:31 AM January 19, 2025 9:31 AM

views 13

दहावी-बारावी प्रवेशपत्रावरील जाती प्रवर्ग काढला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजित इयत्ता बारावी परीक्षा प्रवेश पत्रावरील जातीचा प्रवर्ग काढून टाकण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला आहे.   याबाबत विविध स्तरात नाराजी व्यक्त केल्यानंतर मंडळानं हा निर्णय घेतला असून दिलगिरीही व्यक्त केली आहे. नवीन प्रवेशपत्र 23 जानेवारीपासून उपलब्ध होतील. इयत्ता दहावीच्या प्रवेशपत्रातही हा बदल करण्यात येणार असून त्याची प्रवेशपत्रं उद्या दुपारी तीन वाजल्यापासून संबंधित शाळांना उपलब्ध होतील.

August 3, 2024 7:31 PM August 3, 2024 7:31 PM

views 10

राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार

विद्यार्थ्यांना राज्य घटनेचं महत्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येत्या १५ ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संविधानातून सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळते. विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणाऱ्या या मंदिरांमध्ये भ...