July 6, 2024 10:10 AM July 6, 2024 10:10 AM
11
कम्युनिटी इनोव्हेटर फेलोच्या पदवीप्रदान सोहळ्यात स्टोरीज ऑफ चेंजच्या दुसर्या आवृत्तीचं प्रकाशन
अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीने कम्युनिटी इनोव्हेटर फेलो च्या दुसऱ्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा काल नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ चेंज च्या दुसर्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. जगाला एक चांगलं स्थान बनवण्यासाठी आवश्यक असलेला बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेने जगण्याचं धाडस करणार्यांसाठी हा उपक्रम आहे. या प्रसंगी बोलतांना, AIM चे मिशन संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांनी शाश्वत विकासाच्या तत्त्वांना अनुसरून आरोग्य सेवा, शिक्षण, कृषी आणि वित्तीय सेवा यांमधील उपाय...