August 8, 2024 7:25 PM August 8, 2024 7:25 PM

views 18

भारतानं शेअर बाजारांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं – गुंतवणूक तज्ज्ञ

गेल्या काही दशकांमध्ये भारतीय शेअर बाजारानं जगात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शेअर बाजारांमध्ये आपलं स्थान पक्कं केल्याची प्रतिक्रिया गुंतवणूक तज्ज्ञांनी नोंदवली आहे. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून अर्थार्जन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे कल वाढल्याचं यात म्हटलं आहे.

August 2, 2024 2:26 PM August 2, 2024 2:26 PM

views 16

शेअर बाजारात घसरण

आज सकाळच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६४० अंकांनी घसरून ८१ हजार २२७वर आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी काल २५ हजारांचा उच्चांक गाठल्यानंतर आज ५० अंकांनी घसरत २४ हजार ७४०वर आला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८३ रुपये ७३ पैशांवर आला आहे.

July 26, 2024 7:14 PM July 26, 2024 7:14 PM

views 3

शेअर बाजारात आज तेजीचा जोर

सलग पाच सत्रांमधल्या घसरणी नंतर शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज तब्बल १ हजार २९३ अंकांची उसळी घेतली आणि तो ८१ हजार ३३३ अंकांवर बंद झाला.   बाजार बंद होण्यापूर्वी झालेल्या खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टिनं आज २४ हजार ८६१ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला. मात्र तो नंतर थोडा खाली आला, आणि दिवसअखेर ४२९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ८३५ अंकांवर बंद झाला.   धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या समभागांनी आज सर्वात जास्त तेजी नोंदवली, तर वाहन उद्यो...

July 18, 2024 7:21 PM July 18, 2024 7:21 PM

views 55

देशातल्या शेअर बाजारात नवे उच्चांक

देशातल्या शेअर बाजारात आजही तेजी दिसून आली आणि नवे विक्रम प्रस्थापित झाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा ८१ हजार अंकांची पातळी ओलांडण्याचा आणि ८१ हजाराच्या वर बंद होण्याचा विक्रम नोंदवला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पहिल्यांदाच २४ हजार ८०० च्या पलीकडे जाऊन बंद झाला. सुरुवातीची घसरण भरुन काढत दोन्ही निर्देशांकांनी दिवसअखेर तेजीकडे वाटचाल केली. दिवसअखेर सेन्सेक्स ६२७ अंकांची वाढ नोंदवून ८१ हजार ३४४ अंकांवर आणि निफ्टी १८८ अंकांची तेजी नोंदवून २४ हजार ८०१ अंकांवर बंद झाला. माह...