January 3, 2025 7:04 PM January 3, 2025 7:04 PM

views 6

देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या सत्रात कमावलेल्या पैकी जवळपास निम्मी तेजी आज घालवली. दिवसअखेर सेन्सेक्स ७२१ अंकांनी घसरुन ७९ हजार २२३ अंकांवर स्थिरावला. निफ्टी १८४ अंकांची घसरण नोंदवून २४ हजार ५ अंकांवर बंद झाला. व्यवहारांच्या दरम्यान निफ्टी २४ हजारांच्याही खाली गेला होता. माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा आणि औषध उद्योगाच्या समभागात आज घसरण झाली.

January 2, 2025 7:23 PM January 2, 2025 7:23 PM

views 2

देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली. सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले. व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं ८० हजारांची पातळीही ओलांडली होती. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४३६ अंकांची वाढ नोंदवून ७९ हजार ९४४ अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान २४ हजार २०० च्या पलीकडे गेलेला निफ्टी दिवसअखेर ४४६ अंकांची तेजी नोंदवून २४ हजार १८९ अंकांवर स्थिरावला. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहन विक्रीमुळं वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत होते. बँका आणि म...

December 13, 2024 7:43 PM December 13, 2024 7:43 PM

views 13

देशातल्या शेअर बाजारात दिवसअखेर मोठी तेजी

देशातल्या शेअर बाजारात आज मोठे चढ - उतार दिसून आले. सकाळच्या सत्रात सुमारे बाराशे अंकांनी घसरुन सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली जाणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण नंतर बाजारात तेजी सुरू झाली आणि दिवसअखेर सेन्सेक्स ८४३ अंकांनी वधारुन ८२ हजार १३३ अंकांवर बंद झाला. निफ्टी २२० अंकांची तेजी नोंदवून २४ हजार ७६८ अंकांवर स्थिरावला. वर्षअखेर आणि सुट्या यामुळं ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण वाढेल, अशी आशा आहे. त्यातच अमेेरिकेकडूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा व्यवसाय मिळेल, अशी शक्यता निर्माण झाल्यानं...

December 5, 2024 7:08 PM December 5, 2024 7:08 PM

views 32

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८१० अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज ८१० अंकांची उसळी घेतली आणि तो  ८१ हजार  ७६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही  २४१  अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ७०८ अंकांवर बंद झाला. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं शेअर बाजारातल्या सूत्रांनी सांगितलं.

November 6, 2024 7:47 PM November 6, 2024 7:47 PM

views 12

भारतीय शेअर बाजार सावरले

देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने गेले दोन दिवस शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. मात्र, आज अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना त्यात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज ९०१ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ३७८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २७१ अंकांची वाढ होऊन तो  २४ हजार ४८४ अंकांवर बंद झाला. 

November 4, 2024 7:24 PM November 4, 2024 7:24 PM

views 35

देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकी अध्य पदाची निवडणूक आणि फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढावा समितीची बैठक या दोन कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमाराला सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभरातल्या निचांकी पातळीवर होते. नंतर त्यात सुधारणा दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स ९४२ अंकांनी घसरुन ७८ हजार ७८२ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३०९ अंकांनी घसरुन २३ हजार ९९५ अंकांवर बंद झाला. जवळपास सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात घसरण दिसून आली. 

October 22, 2024 7:15 PM October 22, 2024 7:15 PM

views 35

जागतिक बाजारातल्या परिस्थितीमुळं देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण

जागतिक बाजारातल्या परिस्थितीमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात घसरण दिसून आली. सेन्सेक्स ८० हजारांची पातळी तोडण्याच्या उंबरठ्यावर आहे तर निफ्टी २४ हजार ५०० च्या खाली गेला. दिवसअखेर ९३१ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ८० हजार २२१ अंकांवर बंद झाला. निफ्टी ३०९ अंकांनी कोसळून २४ हजार ४७२ अंकांवर बंद झाला.

October 8, 2024 7:16 PM October 8, 2024 7:16 PM

views 6

शेअर बाजारातली आठवडाभर सुरू असलेली घसरण थांबली

विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे सकारात्मक परिणाम आज देशातल्या शेअर बाजारांवर झाले. त्यामुळं आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण थांबली. दिवसअखेर सेन्सेक्स ५८५ अंकांनी वधारुन ८१ हजार ६३५ अंकांवर बंद झाला. निफ्टी २१७ अंकांची तेजी नोंदवून २५ हजार १३ अंकांवर स्थिरावला. सरकारी क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात आज तेजी होती.

September 6, 2024 7:11 PM September 6, 2024 7:11 PM

views 3

देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण

अमेरिकेतले बेरोजगारीचे संभाव्य आकडे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात बदल होण्याच्या शक्यतेमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १ हजार १७ अंकांनी घसरून ८१ हजार १८४ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २९३ अंकांची घसरण नोंदवून २४ हजार ८५२ अंकांवर स्थिरावला. या घसरणीमुळं मुंबई शेअर बाजारातल्या कंपन्यांचं बाजारमूल्य सव्वा ५ लाख कोटींहून अधिक रुपयांनी कमी झालं. वाहन, बँका, वित्तीय सेवा, ऊर्जा, पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज घसरण झाली.

August 16, 2024 7:41 PM August 16, 2024 7:41 PM

views 49

अमेरिकेतलं मंदीचं सावट दूर झाल्यानं देशातल्या शेअर बाजारात मोठी तेजी

गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठी तेजी नोंदवली. सेन्सेक्स १ हजार ३३१ अंकांची वाढ नोंदवून ८० हजार ४३७ अंकांवर बंद झाला. निफ्टीही ३९७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ५४१ अंकांवर बंद झाला. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या ताज्या आकडेवारीनुसार मंदीचं सावट दूर झाल्यानं ही तेजी दिसून आली. वाहन, माहिती तंत्रज्ञान, बँकींग क्षेत्रातले समभाग आज वधारले.