April 15, 2025 8:59 PM April 15, 2025 8:59 PM
21
शेअर बाजारात जोरदार तेजी
अमेरिकेनं अतिरीक्त आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं आजही देशातले शेअर बाजार जोरदार तेजीत होते. सेन्सेक्स आज तब्बल १ हजार ५७८ अंकांनी वधारुन ७६ हजार ७३५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०० अंकांची वाढ नोंदवून २३ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. यामुळं गुंतवणूकदारांची मालमत्ता सुमारे ११ लाख कोटी रुपयांनी वाढली. गेल्या २ सत्रात सेन्सेक्स सुमारे २ हजार ९०० आणि निफ्टी १ हजार अंकांनी वधारला आहे. दोन्ही निर्देशांक सध्या १५ दिवसातल्या उच्चांकी पातळीवर आहेत.