December 8, 2025 7:13 PM December 8, 2025 7:13 PM

views 8

शेअर बाजारात जोरदार नफा वसुली

नफावसुली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार घसरण झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढाव्याच्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार साशंक आहेत. दिवसअखेर सेन्सेक्स ६१० अंकांची घट नोंदवून ८५ हजार १०३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २२६ अंकांनी घसरुन २५ हजार ९६१ अंकांवर थांबला. सत्रादरम्यान दोन्ही निर्देशांक आणखी जास्त घसरले होते पण नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. बांधकाम उद्योग, बँका यासारख्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात आज मोठी घसरण झाली.

December 1, 2025 1:42 PM December 1, 2025 1:42 PM

views 15

देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श

देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला.  सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ८६ हजार ८६ अंकांवर झेप घेतली, तर निफ्टी २६ हजार ३११ वर पोहोचला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी एकच्या सुमाराला सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांची घसरण नोंदवत ८५ हजार ६००वर आला, तर निफ्टी साधारण १२० अकांनी घसरून २६ हजार १८५वर पोहोचला. सध्या पुन्हा दोन्ही निर्देशांकात थोडीफार तेजी दिसते आहे.

October 30, 2025 7:11 PM October 30, 2025 7:11 PM

views 43

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे घसरण

भारतीय शेअर बाजारांमध्ये आज घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ५९२ अंकांची घसरण झाली आणि तो ८४ हजार ४०४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७६ अंकांची घसरण नोंदवत २५ हजार ८७७  अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदणी झालेल्या ३० पैकी २३ कंपन्यांनी आज घसरण नोंदवली. यात उर्जा, तंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे. तर खनिज तेल, वायू,  सिमेंट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आज वाढ पाहायला मिळाली. 

October 20, 2025 8:07 PM October 20, 2025 8:07 PM

views 70

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ४११ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ३६३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या ३० पैकी १९ कंपन्यांनी वाढ नोंदवली आहे. यात बँका, गुंतवणूक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास अडीच हजारांहून अधिक कंपन्यांचे समभाग आज वधारले.    लक्ष्मीपूजनानिमित्त उद्या मुंबईच्या शेअर बाजारांमधे मुहूर्ताचे सौदे दुपारी पावणे दोन ते पावणेतीन या वेळात होणार आहेत.

October 15, 2025 7:06 PM October 15, 2025 7:06 PM

views 61

देशातल्या शेअर बाजारात तेजी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या घसरणीला देशातल्या शेअर बाजारांनी आज मोठ्या तेजीसह विराम दिला. जागतिक बाजारपेठेतलं सकारात्मक वातावरण आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमतीमुळं देशातले शेअर बाजार आज सकाळपासून तेजीत होते. दिवसअखेर सेन्सेक्समधे ५७५ अंकांची वाढ झाली आणि तो ८२ हजार ६०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७८ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३२३ अंकांवर बंद झाला.

June 23, 2025 1:13 PM June 23, 2025 1:13 PM

views 72

भारतीय शेअर बाजारात घसरण

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. आयटी आणि ऑटो क्षेत्रात विक्री झाल्याचे थेट परिणाम निर्देशांकांवर झाले. अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर ही घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ६०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये १५०हून अधिक अंकांची घसरण झाली आहे.

June 20, 2025 7:11 PM June 20, 2025 7:11 PM

views 13

शेअर बाजारात मोठी तेजी

इस्राइल - इराण संघर्षामुळं सलग तीन दिवस घसरलेल्या देशातल्या शेअर बाजारात  आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मोठी तेजी झाली. त्यामुळं सेन्सेक्स पुन्हा ८२ हजार आणि निफ्टी २५ हजाराच्या पलीकडे जाऊन बंद झाला.    इराणसोबत चर्चेची दारं अजून खुली असून इस्राइलला पाठिंबा देण्यावर २ आठवड्यात निर्णय घेऊ असं अमेरिकन म्हटल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर झाला. सेन्सेक्स दिवसअखेर १ हजार ०४६ अंकांनी वधारुन ८२ हजार ४०८ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ३२० अंकांनी वधारुन २५ हजार ११२ अंकांवर स्थिरावला. बांधकाम, वित्...

May 12, 2025 6:48 PM May 12, 2025 6:48 PM

views 44

भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर आणि अमेरिका आणि चीनमधल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वूमीवर आज भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार ९७५ अंकाची वाढ नोंदवत ८२ हजार ४३० अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९१७ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ९२५ अंकांवर बंद झाला.    ही चालू वर्षातली आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे. परकीय गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक आणि जागतिक पातळीवरचे सकारात्मक संकेत यांमुळे ही वाढ दिसून आल्याचं तज्ञांचं म्हणणं आ...

April 17, 2025 6:54 PM April 17, 2025 6:54 PM

views 34

संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्याचा केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला

शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मितीचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावे. त्यासाठी माहितीपूर्ण आणि संयमाने निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे.  मुंबई शेअर बाजाराच्या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.    कंपन्यांनी पारदर्शकता, व्यवस्थापनात व्यावसायिकता ठेवावी, नियामकांनी तत्पर रहावे आणि बाजारांनी गुंतवणूकदार केंद्री सुधारणा कराव्या असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या नागरिकांच्या वित्तीय सक्षमीकरणासाठी सरक...

April 17, 2025 7:36 PM April 17, 2025 7:36 PM

views 47

देशातल्या शेअर बाजारात तेजी

देशातले शेअर बाजार आजही जोरदार तेजी नोंदवून बंद झाली. सेन्सेक्स १ हजार ५०९ अंकांनी वधारुन ७८ हजार ५५३ अंकांवर विसावला. निफ्टी ४१४ अंकांची वाढ नोंदवून २३ हजार ८५२ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीही सुमारे पावणे बाराशे अंकांची वाढ नोंदवून ५४ हजार २९० वर बंद झाला. हा निर्देशांक उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ आहे. सुरुवातीच्या सत्रात घसरणीत असलेले हे निर्देशांक बँकिंग समभागातल्या तेजींच्या बळावर वधारले.