August 27, 2024 12:27 PM August 27, 2024 12:27 PM
11
शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी भारतीय नौदलाचं एक पथक रवाना
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरला पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा काल कोसळला होता. त्यानंतर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं.