November 13, 2024 9:22 AM November 13, 2024 9:22 AM
9
देशातल्या 11 राज्यातील 33 विधानसभा जागांसाठी तसेच वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
देशातल्या 11 राज्यातील 33 विधानसभा जागांसाठी तसच केरळ मधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजस्थानमधल्या ७ , पश्चिम बंगाल ६ , आसाम ५, बिहार ४, कर्नाटकमधल्या ३ तर मध्यप्रदेश आणि सिक्कीम मधल्या 2 विधानसभा जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. तसंच केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालय मधील विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेवरील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.