December 7, 2024 8:28 PM December 7, 2024 8:28 PM

views 4

महाराष्ट्र विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचं कामकाज स्थगित, ९ तारखेला अध्यक्षांची निवड

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशीष जयस्वाल या तालिका सदस्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह १७३ सदस्यांचा शपथ विधी आज झाला. उद्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड येत्या सोमवारी होईल.  दरम्यान, ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोध म्हणून विरोध...