August 5, 2025 7:31 PM August 5, 2025 7:31 PM
11
एसटीच्या अतिरीक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापराच्या सुधारित धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रीमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत १३ खासगी स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रति रुग्ण २ हजारांवरून ६ हजार रुपये करायलाही मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र ...