December 13, 2025 9:01 PM December 13, 2025 9:01 PM
21
स्टेट बँकेची मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात
स्टेट बँकेनं मूळ व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. यामुळं बँकेचा रेपो दराशी संलग्न व्याजदर ७ पूर्णांक ९ दशांश टक्के होईल. सोमवारपासून हे नवे दर लागू होतील. यामुळं गृह, वाहन आणि इतर कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसंच मुदत ठेवींवरचे व्याज दरही कमी होतील. इंडियन ओव्हरसीज बँकेनंही रेपो संलग्न व्याजदर पाव टक्क्यांनी कमी केला आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदर पाव टक्क्यांची कपात केल्यानंतर दोन्ही बँकांनी हा निर्णय घेतला आहे.