August 5, 2025 7:17 PM

views 33

नागरिकांना रिक्षा, टॅक्सीची सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकार छावा राइड ॲप सुरू करणार

ओला, उबेर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार ‘छावा राइड’ या ॲपच्या माध्यमातून राज्य सरकार नागरिकांना खासगी वाहतूक सुविधा पुरवणार आहे.   या ॲपवरुन नागरिकांना रिक्षा, टॅक्सी आणि बसचे आरक्षण करता येईल. एसटी महामंडळ हे ॲप सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

August 3, 2025 2:11 PM

views 149

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल.   चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्र...

June 13, 2025 8:54 AM

views 15

राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

March 15, 2025 9:46 AM

views 17

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीत राज्य दुसऱ्या स्थानी

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 92 हजार 936 सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.   गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात 10 मार्च 2025 पर्यंत 10 लाख 9 हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच 2026-27 पर्यंत 1 कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

March 1, 2025 1:27 PM

views 30

राज्यस्तरीय मेळाव्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत राज्यस्तरीय मेळाव्याचं उद्घाटन पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. राज्यभरात जिल्हास्तरावल्या ३५ तर तालुकास्तरावल्या ३५५ शाळांमधे हा मेळावा होत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या मुला मुलींची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.   जन्मजात आजार आणि इतर आजारांवर मोफत उपचार तसंच संदर्भ सेवा आणि विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बालकाचं आरोग्य हे देशाच्या दृष्टीने महत्वाचं असतं. त्यामुळे सर्वांनी आपल्या बाल...

February 4, 2025 9:08 AM

views 24

राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण, 5 संशयित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आत्तापर्यंत जीबीएस आजाराचे 163 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 127 रुग्णांना जीबीएस आजार झाल्याचं तपासातून निश्चित झालं आहे. 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल 5 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार वाढण्याची कारणे शोधण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्या वतीने संशोधन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे. दरम्यान, काल अहिल्यानगर शहरात या आजाराचा एक संशयित रुग्ण आढळून आला असून त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे ...

December 27, 2024 11:57 AM

views 19

लातूरमध्ये मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन

लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे.   दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख य...

December 4, 2024 8:31 AM

views 30

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी; आजही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

राज्यात काल सर्वत्र अंशतः ढगाळ हवामान होतं. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद आहे. आज कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर विदर्भात हवामान कोरडं राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

November 25, 2024 7:50 PM

views 13

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. ती झाल्यावर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय होईल, असं अजित पवार यांनी आज सातारा जिल्ह्यात कराड इथं सांगितलं.   विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र ...

November 13, 2024 10:47 AM

views 16

राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात...