July 15, 2025 2:59 PM

views 13

पाचव्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यास सुरूवात

उदयोग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचा  प्रमुख उपक्रम असलेल्या पाचव्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत.   केंद्रसरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला अनुसरून, स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम, स्टार्टअप्सना मान्यता देऊन, कर सवलत, नियमन सुलभता, निधीची उपलब्धता आणि क्षमता विकास, यासारख्या उपक्रमांमधून समर्थन देतो, असं  वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे.    राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांमध्ये कृषी,...

September 8, 2024 12:03 PM

views 11

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती msins.inया संकेतस्थळावर देण्यात आली आहे.