November 5, 2025 8:01 PM November 5, 2025 8:01 PM
56
स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार
स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्याने डिजीटल दरी मिटणार आहे. प्रत्येक शाळा, आरोग्य केंद्र आणि गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. स्टारलिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. &...