September 18, 2025 3:00 PM September 18, 2025 3:00 PM

views 4

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु असल्याचं कर्मचारी निवड आयोगानं म्हटलं आहे. यंदाच्या १२ सप्टेंबर पासून  देशाच्या १२९ शहरांमध्ये रोज तीन सत्रांमध्ये घेतल्या जात असलेल्या या परीक्षेला यंदा २८ लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी बसल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच वैध कारणामुळे परीक्षा देता येणार नाही, अशा जवळजवळ एक हजार उमेदवारांच्या परीक्षेच्या तारखा पुन्हा निश्चित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.