December 16, 2024 7:16 PM December 16, 2024 7:16 PM

views 12

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द

एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी  हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले.   एसटीला नोव्हेंबरमध्ये ९४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं. प्रतिदिन ६० लाख प्रवाशांनी एसटीचा प्रवास केला अशी माहिती त्यांनी दिली. यंदा भाडेवाढ न करता उत्पन्नात वाढ झाली हे प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक आहे, असं ते म्हणाले. सुमारे ३१ कोटी ३६ लाख र...

December 9, 2024 4:46 PM December 9, 2024 4:46 PM

views 79

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर

देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या १८ वर्षांत १ हजार २९ प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीतून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं.  

September 24, 2024 6:54 PM September 24, 2024 6:54 PM

views 12

एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी चालक आणि वाहकांना रोख प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय

एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना एसटीतर्फे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीसाठी उत्पन्नाचं उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात देण्यात येणार आहे. चालक-वाहकांची कामगिरी चांगली व्हावी यासाठी एक महिन्याकरता प्रायोगिक तत्वावर ही योजना महामंडळाने सुरू केली आहे. एसटी महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी विविध अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमांमुळे ...

September 24, 2024 9:25 AM September 24, 2024 9:25 AM

views 11

आमदार भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी

आमदार भरत गोगावले यांनी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. एसटीच्या जागा विकसित करण्याचा भाडेकरार ३० वर्षावरून ६० वर्षं करण्याच्या राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं.

September 4, 2024 7:05 PM September 4, 2024 7:05 PM

views 8

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीतून संपकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कालपासून सुरू असलेल्या संपामुळं प्रवाशांचे हाल सुरू आहे.   गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारल्यानं गावी जाणाऱ्या नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनंही आपल्या कर्मचाऱ्यांना केलं आहे.

August 5, 2024 10:16 AM August 5, 2024 10:16 AM

views 22

एसटी महामंडळातर्फे ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम

श्रावण महिन्याचा प्रारंभ आजपासून, म्हणजे श्रावणी सोमवारपासून होत आहे. यानिमित्त राज्यातल्या ज्योतिर्लिंगांच्या विविध प्रमुख शिवमंदिरांसह ठीकठीकाणच्या शिव मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे. दरम्यान, श्रावण महिन्यात एसटी महामंडळानं 'श्रावणात एसटी संगे तीर्थाटन' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महामंडळाच्या राज्यातल्या विविध आगारांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल; या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, आणि महिलांना मोफत किंवा माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येईल. प्रवाशांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्...

June 13, 2024 4:38 PM June 13, 2024 4:38 PM

views 46

एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. महामंडळानं आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी शक्य होणार आहे, असा दावा महामडळानं केला आहे.