March 27, 2025 3:15 PM March 27, 2025 3:15 PM
6
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एसटी महामंडळ जादा गाड्या सोडणार
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत ही सुविधा उपलब्ध असून महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण करता येईल.