October 13, 2025 7:22 PM October 13, 2025 7:22 PM

views 33

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट !

एसटी महामंडळाच्या ८५,००० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६,००० रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून १२,५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक मुंबईत आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. साडे सहा हजार पगारवाढीची थकित रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ६५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

April 11, 2025 8:45 PM April 11, 2025 8:45 PM

views 6

ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख निश्चित, ‘या’ दिवशी होणार पगार !

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, ही अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी असेल, अशी ग्वाही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आज महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात फक्त ५६ टक्के वेतन देता आलं, हे अत्यंत दुर्दैवी असून उर्वरित वेतनासाठी आपण अर्थखात्यांच्या सचिवांची भेट घेतल्याचंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. विविध सवलतीपोटी शासनाकडे महामंडळाचे थकीत असलेले १ हजार ७६ कोटी रुपये तात...