January 17, 2025 7:39 PM

views 23

एसटी महामंडळात दरवर्षी ५ हजार बसची खरेदी होणार

एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या बस खरेदी करणार आहे. त्यासाठीमहामंडळा अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला. तसंच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्त्वावर बस न घेण्याचा निर्णय घेतल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. नवीन बसेसच्या तिन्ही बाजूंना डिजिटल जाहिरातीची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.    महामंडळानं उत्पन्न वाढीसाठी पूरक योजना आणाव्यात,  कर्मचाऱ्यांचं वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची काळजी घ...

December 19, 2024 9:24 AM

views 27

एसटीला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न

दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या वाढल्यानं एसटी महामंडळाला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न मिळालं. हे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक मासिक उत्पन्न आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांनी प्रवास केला. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. हे विक्रमी उत्पन्न एसटीवरील सर्वसामान्य प्रवाशांच्या विश्वासाचं द्योतक आहे, असं महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सांगितलं. मात्र इंधनाचे वाढते...

December 12, 2024 3:31 PM

views 33

वाशिम आगारातून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद

परभणी इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीच्या अवमानना प्रकरणी काल झालेल्या आंदोलनात अनेक एसटी बसचं नुकसान झालं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं आज सकाळपासून वाशिम आगारातून हिंगोली, परभणी, नांदेडकडे जाणाऱ्या एसटी गाड्या वाशिम आगारात थांबवण्यात आल्या आहेत. अकोल्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी गाड्याही वाशिम बस स्थानकावर उभ्या आहेत. यामुळे वाशिम येथील बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाल्याची म...

October 14, 2024 3:37 PM

views 22

दिवाळीत होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळं होणारी भाडेवाढे मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं.

October 9, 2024 6:25 PM

views 24

एसटीच्या सेवेत सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत पदभरती

सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीतल्या एकूण १ हजार ५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत चालक, आणि वाहक या पदांवर सामावून घेतलं जाणार आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही माहिती दिली.    या भर्तीमध्ये निवड झालेल्यांपैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भर्तीमधल्या प्रतीक्षा यादीवरच्या सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तसंच, प्रतीक्षा यादीवरच्या उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झ...

September 13, 2024 8:52 AM

views 26

एसटी महामंडळाला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा

राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीला ऑगस्ट महिन्यात १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये नफा झाला आहे. राज्य शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास तसंच सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात ५० टक्के सवलत या दोन योजना सुरू केल्या, यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ झाली. सध्या सरासरी ५४ लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करत असल्याचं, महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

September 6, 2024 9:12 AM

views 78

एसटीच्या सर्व बसमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन

दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

September 5, 2024 6:57 PM

views 112

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षण

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षित आसन यापुढं कायमस्वरूपी दिलं आहे. ते कोणत्याही थांब्यावरून बसमधे आले तर त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे.

September 5, 2024 9:27 AM

views 27

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, संप मागे

राज्य परिवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये साडे सहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणाऱ्या विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, या निर्णयानंतर, एसटी कर्मचारी कृती संघटनेने आपला संप मागे घेतल्याचं, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे....

September 3, 2024 7:04 PM

views 28

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संप

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा सुविधा मिळाव्यात, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसंच इतर सुविधाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं राज्य सरकारला निवेदन देऊन सुद्धा त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही, राज्य सरकार विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा करत असतांना आमच्या मागण्या आणि वेतन वाढीकडेही सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आहे, या संदर्भात ए...