October 29, 2025 3:37 PM
49
दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाला ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न
राज्य परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या वर्षीच्या दिवाळी हंगामातल्या उत्पन्नापेक्षा ते ३७ कोटी रुपयांनी जास्त आहे. दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळालं असून यंदाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे. सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाला मिळालं असून त्याखालोखाल जळगाव आणि नाशिक विभागाचा क्रमांक लागतो.