November 26, 2025 7:13 PM November 26, 2025 7:13 PM

views 42

ST कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची घोषणा!

शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही  समस्या असेल तर एसटीनं त्यांच्यासाठी  हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००- २२१- २५१ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.    विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी, तसंच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार आल्यास जितक्या दिवसाचं  शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार...

October 2, 2025 6:16 PM October 2, 2025 6:16 PM

views 198

प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ या नावानं एसटीचं नवीन ॲप

एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी या नावानं नवीन ॲप आणलं आहे. ते आजपासून लोकांना उपलब्ध होत असून या प्रारंभीच्या टप्प्यात काही त्रुटी दिसून आल्या तर, प्रवाशांनी त्याबाबत जरुर सूचना कराव्यात, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.   

August 5, 2025 7:31 PM August 5, 2025 7:31 PM

views 13

एसटीच्या अतिरीक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापराच्या सुधारित धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या अतिरीक्त जमिनींचा व्यापारी तत्त्वावर वापर करायच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणानुसार महामंडळाच्या जमिनींच्या भाडेपट्टा कराराचा कालावधी आता ६० वर्षांऐवजी ४९ वर्षांच्या दोन टप्प्यात मिळून ९८ वर्षे करण्यास मंजुरी देण्यात आली.   राज्य मंत्रीमंडळाच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत १३ खासगी स्वयंसेवी संस्थांचं अनुदान प्रति रुग्ण २ हजारांवरून ६ हजार रुपये करायलाही मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र ...

July 12, 2025 4:44 PM July 12, 2025 4:44 PM

views 16

आषाढीला एसटीच्या ५ हजार २०० जादा बसगाड्यांतून ९ लाखांहून अधिक भाविकांची सुरक्षित वाहतूक

आषाढी यात्रेनिमित्त यंदा ५ हजार २०० जादा बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीने साडे एकवीस हजार फेऱ्यांद्वारे तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक - प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आणि त्यांना विठ्ठल दर्शन घडवलं आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.   महामंडळानं गेल्या वर्षीपेक्षा यंदा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपये जास्त उत्पन्न मिळवलं. चांगलं उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरुप देवदर्शन घडव...

May 15, 2025 7:42 PM May 15, 2025 7:42 PM

views 17

एसटी महामंडळ ३,००० स्मार्ट बसगाड्या खरेदी करणार

सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ ३,००० स्मार्ट बसगाड्या खरेदी करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बसगाड्यांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, वायफाय, टीव्ही, बस लॉक प्रणाली, आग प्रतिबंधक यंत्रणा असेल.   या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणं, तसेच वक्तशीरपणा वाढवायला देखील मदत होणार आहे, असं सरनाईक म्हणाले.

April 10, 2025 7:12 PM April 10, 2025 7:12 PM

views 65

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष आहेत. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.   पालघरमध्ये लवकरच नवं प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केली आहे. पालघर विभागातल्या ८ आगारांना प्रत्येकी ५ नवीन एसटी बस देण्यात येत असल्याच...

March 12, 2025 3:20 PM March 12, 2025 3:20 PM

views 15

ST महामंडळासाठी भाडेतत्वावर बसगाड्या घेण्याच्या निविदा प्रक्रियेची चौकशी

टोरेस सारख्या गुंतवणूक कंपन्यांकडून देण्यात येणारं मोठा व्याज परतावा देण्याचं आश्वासन हा ९९ टक्के प्रकरणांमध्ये घोटाळा असतो, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.    शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही, असं सांगत विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत चर्चेतून मार्ग काढून या मह...

January 25, 2025 7:24 PM January 25, 2025 7:24 PM

views 62

महाराष्ट्रात एसटीची भाडेवाढ आजपासून लागू

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासभाड्यात आजपासून १४ पूर्णांक ९५ शतांश टक्के वाढ करण्यात आली आहे.   हकीम समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार साध्या बसचं भाडं ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, जलद सेवा बससाठी ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी ११ रुपये, रात्र सेवा बस ११ रुपये, निम आराम १५ रुपये, विनावातानुकूलीत शयन आसनी १५ रुपये, विनावातानुकूलीत शयनयान १६ रुपये, शिवशाही साठी ६ किलोमीटर प्रति टप्प्यासाठी १६ रुपये भाडे आकारण्यात येणार...

January 24, 2025 8:04 PM January 24, 2025 8:04 PM

views 9

एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवास भाड्यात वाढ

एसटी महामंडळानं प्रवासभाड्यात केलेली १४ पूर्णांक ९७ शतांश टक्के दरवाढ आज पासून लागू असून, एक फेब्रुवारी पासून रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ होणार आहे. ही तीन रुपयांची असेल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. जुन्या योजना आणि सवलती कायम राहणार असून, २ हजार कोटी रुपयांची देणी, तसंच कर्मचाऱ्यांचे पगार, या आणि इतर कारणांमुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं त्यांनी सांगितल.

January 19, 2025 7:19 PM January 19, 2025 7:19 PM

views 12

बीड जिल्ह्यात एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला. पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या या तिघांना बीडहून परभणीकडे जाणाऱ्या बसची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही घोडका राजुरीचे रहिवासी होते. अपघातानंतर संतप्त जमावानं बस पेटवून दिली. पोलिसांनी बसचालकाला अटक केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचं अर्थसहाय्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे.