April 12, 2025 6:17 PM April 12, 2025 6:17 PM

views 78

दहावी, बारावी: पुरवणी परीक्षांसाठी नव्या विद्यार्थ्यांना बसण्याची मुभा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं  जुलै - ऑगस्ट २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितलं.   येत्या मंगळवारपासून परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुर...

February 21, 2025 3:03 PM February 21, 2025 3:03 PM

views 14

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या ५ हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून १६ लाख ११ हजार ६१०विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे.   दरम्यान जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केलं. स्थानिक झेरॉक...

February 20, 2025 7:23 PM February 20, 2025 7:23 PM

views 13

उद्यापासून दहावीची परीक्षा

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदा राज्यातल्या 5 हजार 130 मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. 

February 11, 2025 7:58 PM February 11, 2025 7:58 PM

views 12

SSC-HSC परीक्षेत सामूहिक कॉपी होणाऱ्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द

दहावी-बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. तसंच कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश ही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी आ...

January 18, 2025 8:26 PM January 18, 2025 8:26 PM

views 15

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर इतर शाळा, महाविद्यालयातल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिले आहेत. यासोबतच या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियानातर्गंत जनजागृती साप्ताह राबवला जाणार असल्याचंही शिक्षण मंडळानं म्हटलं आहे. यावर्षी सुमारे ३१ लाख विद्यार्थी इयत्ता १०वी आणि १२वीची परीक्षा देणार आहेत.   दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक ...

November 4, 2024 6:58 PM November 4, 2024 6:58 PM

views 10

दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार सहा ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.