November 1, 2025 10:29 AM November 1, 2025 10:29 AM

views 140

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. दोन्ही परीक्षा 18 मार्च रोजी संपतील.   प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारीपासून सुरू होतील. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेलं वेळापत्रक माहितीसाठी आहे; परीक्षेपूर्वी शाळा महाविद्यालयांकडे दिलं जाणारं छापील वेळापत्रकच अंतिम असेल; अन्य समाजमाध्यमांवर ...

February 14, 2025 7:21 PM February 14, 2025 7:21 PM

views 11

दहावी, बारावी क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या क्रीडानिपुण विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांसाठीचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी १० मार्च, २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे अर्ज ‘आपले सरकार’ या पोर्टलच्या माध्यमातून  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठवावेत.

January 30, 2025 8:08 PM January 30, 2025 8:08 PM

views 2

दहावी आणि बारावी केंद्रावर गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा

फेब्रुवारी-मार्च मधे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि  उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्त न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ज्या परीक्षा केंद्रावर मागच्या पाच वर्षांत गैरप्रकार झाले होते त्या श...

November 21, 2024 7:41 PM November 21, 2024 7:41 PM

views 43

दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर दहावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात घेतली जाईल तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ह...

October 17, 2024 7:54 PM October 17, 2024 7:54 PM

views 14

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत महत्वाची अपडेट

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही असं मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकांबद्दल समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची असून ती ग्राह्य धरू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. या परिक्षांची वेळापत्रके यथावकाश मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं....

August 23, 2024 9:31 AM August 23, 2024 9:31 AM

views 11

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.

August 13, 2024 10:16 AM August 13, 2024 10:16 AM

views 10

दहावी आणि बारावी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा काल मंडळानं जाहीर केल्या. दर वर्षीच्या तुलनेत 2025 च्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्यात येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च; तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेण्याचं नियोजन आहे. या तारखांबाबत काही हरकती किंवा सूचना असतील, तर त्या येत्या 23 ऑगस्टपर्यंत कळवाव्यात, असं मंडळाच्या प्रसिद्धी पत्र...