December 27, 2024 7:57 PM December 27, 2024 7:57 PM
4
जम्मू आणि काश्मीरमधल्या विविध भागात बर्फवृष्टीला सुरूवात
जम्मू आणि काश्मीरमधल्या विविध भागात आज दुपारी बर्फवृष्टीला सुरूवात झाली. श्रीनगरमधली या मोसमातली ही पहिलीच बर्फवृष्टी आहे. मुघल रोडवरील वाहतूक जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद करण्यात आली आहे. या शिवाय शोपियान, कुलगाम, कोकरनाग, पहलगाम आणि दक्षिण काश्मीरमधील काही भागातही बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे.