November 15, 2024 2:43 PM

views 25

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकांमध्ये नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षाला पुन्हा बहुमत

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. अजून मतमोजणी सुरू असली तरी आतापर्यंत संसदेच्या निवडणुकीतल्या १७१ पैकी १४१ जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजूबत पाठबळ मिळेल. २२५ सदस्यीय संसदेतल्या २९ नामनिर्देशित सदस्यांमध्येही याच पक्षाच्या सदस्यांना अधिकाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला आतापर्यंत ३५ जागा मिळाल्या आहेत. म...

September 22, 2024 8:00 PM

views 15

नॅशनल पीपल्स पॉवरचे अनुरा कुमार दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवरचे अनुरा कुमार दिसनायके विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. पहिल्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला आवश्यक असलेली ५० टक्के मतं मिळाली नाहीत. त्यामुळे आघाडीच्या दोन उमेदवारांव्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांना वगळून त्यांना मिळालेली दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये विभागली गेली. त्यात सर्वाधिक मतं मिळाल्यानं दिसनायके यांना विजयी घोषित करण्यात आलं. सजिथ प्रेमदासा दुसऱ्या स्थानावर राहिले.