January 8, 2026 1:10 PM January 8, 2026 1:10 PM

views 3

SriLanka: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा, लष्करी देवाणघेवाण आणि श्रीलंकेच्या लष्कराला समर्थन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याशिवाय संरक्षण सहकार्य, मानवतावादी मदत, आपत्ती निवारण क्षेत्रातलं सहकार्य याबाबत जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री, संरक्षण सचिव यांच्याशीही चर्चा केली.

December 5, 2025 1:40 PM December 5, 2025 1:40 PM

views 23

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ४८६ जणांचा मृत्यू

श्रीलंकेत आलेल्या विनाशकारी दितवाह चक्रीवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या ४८६ वर पोहोचली असून अद्याप ३४१ जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत १ लाख ७१ हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून देशभरात सुमारे बाराशे बचाव केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.  दरम्यान ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारत श्रीलंकेला विविध पातळ्यांवर मदत पोहोचवत आहे. भारतीय हवाई दलाच्या हेलीकॉप्टरच्या सहाय्यानं  अडकलेल्या लोकांची सुटका करणं, औषधांचा पुरवठा आणि दळणवळण यंत्रणा पुनर्स्थापित करण्यासाठी भारत सातत्यानं मदत करत  आहे.

December 4, 2025 1:36 PM December 4, 2025 1:36 PM

views 18

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या ४७९ वर

 श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता ४७९ झाली आहे. वादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये साडेतीनशे लोक अद्याप बेपत्ता आहेत. अद्यापही श्रीलंकेतल्या काही दुर्गम भागातून पूर, दरडी कोसळण्याच्या त्याचप्रमाणे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या बातम्या येत आहेत. श्रीलंकेतल्या अनेक भागातला संपर्क अद्याप तुटलेलाच असून काही भाग मदतीपासून वंचित आहेत.   दरम्यान, भारतानं ऑपरेशन सागर बंधूच्या माध्यमातून आवश्यक ती मदत सुरु ठेवली आहे. भारतीय वैद्यकीय पथक आणि तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी कर...

December 3, 2025 1:09 PM December 3, 2025 1:09 PM

views 22

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळात ४७४ जणांचा मृत्यू, ३५६ बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात आतापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला असून ३५६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे. भारतानं श्रीलंकेला या काळात मोठी मदत केली असून वायुदल, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकानं इथं भरीव मदतकार्य केलं आहे. भारतानं आयएनएस सुकन्या जहाजातून पाठवलेली मदतसामग्री श्रीलंकेच्या वायुदलानं हवाईमार्गे पोहोचवली आहे.     भारतीय वायुदलानंही पूर्वेकडच्या प्रांतात अनेकांना आपल्या हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलवलं आहे. एनडीआरएफची...

November 29, 2025 4:52 PM November 29, 2025 4:52 PM

views 32

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ६९ जणांचा मृत्यू, ३४ जण बेपत्ता

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या मृतांचा आकडा ६९ वर पोहोचला असून, ३४ जण अजूनही बेपत्ता आहेत.  तिथल्या दोन लाखापेक्षा जास्त जणांना या वादळाचा फटका बसला असून, मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या भागात ३०० मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं आहे. परिणामी पूर, आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे या क्षेत्रातली वाहतूक, वीज पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा बाधीत झाल्या आहेत.

October 17, 2025 3:14 PM October 17, 2025 3:14 PM

views 24

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेकडून प्रशंसा

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली इथे नीति आयोगाला श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी निरेखा अमरसुरिया यांनी काल भेट दिली. आयोगाचं कामकाज आणि प्रमाणाधारित धोरणनिर्मिती समजून घेण्यात त्यांनी स्वारस्य दाखवलं. अमरसुरिया यांनी श्रीलंकेचा सुधारणांचा प्रवासही यावेळी उलगडून सांगितला तसंच धोरण समन्वयासाठी नीति आयोगास संस्थांची गरज अधोरेखीत केली.    निती आयोगाचे संचालक सुमन बेरी यांनी यावेळी पीएम गतीशक्ती,राष्...

October 17, 2025 12:43 PM October 17, 2025 12:43 PM

views 26

आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेचं कौतुक

आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेनं केलेल्या कामगिरीचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं कौतुक केलं आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गावर श्रीलंकेची सुरू असलेली वाटचाल ठाम असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकेचा आर्थिक वृद्धी दर ५ टक्के होता आणि चालू आर्थिक ४ पूर्णांक २ दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. यातून अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर स्थिरावत असल्याचं स्पष्ट होतंय, असं नाणेनिधीचे आशिया प्रशांत क्षेत्राचे संचालक कृष्णा श्रीनिवास म्हणाले...

August 6, 2025 7:13 PM August 6, 2025 7:13 PM

views 17

श्रीलंकेचे माजी मंत्री शशिंद्र राजपक्षे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक

लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून श्रीलंकेचे माजी मंत्री शशिंद्र राजपक्षे यांना कोलंबो इथल्या त्यांच्या राहत्या घरातून आज सकाळी अटक करण्यात आली .९  मे २ हजार २२ या दिवशी श्रीलंकेत निदर्शनं करण्यात आली,त्यामध्ये एका इमारतीचं नुकसान झालं होतं.त्याच्या  नुकसान भरपाईची मागणी वादग्रस्त ठरली होती,त्यात राजपक्षे यांचा हात असल्याचा संशय आहे.

April 24, 2025 8:04 PM April 24, 2025 8:04 PM

views 17

श्रीलंकेने उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे विकासदर५ टक्क्यावर

श्रीलंकेने उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे ५ टक्के विकासदर गाठला आहे, असं सांगत जागतिक बँकेनं श्रीलंकेच्या आर्थिक कामगिरीचं कौतुक केलं आहे. श्रीलकेनं रचनात्मक सुधारणा आणि कठोर धोरणांची अंमलबजावणी करत देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणली असं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. २०२५ मधे श्रीलंकेचं सकल राष्ट्रीय उत्पन्न साडे तीन टक्के वाढण्याचा अंदाज आहे. कर्जाची यशस्वी पुनर्रचना, राचकोषीय शिस्त आणि सातत्यपूर्ण सुधारणा यावर शाश्वत प्रगती अवलंबून आहे, असं जागतिक बँकेनं म्हटंल आहे.

April 5, 2025 8:11 PM April 5, 2025 8:11 PM

views 25

प्रधानमंत्र्यांनी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली. यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी २०१५ सालच्या दौऱ्यादरम्यान या स्मारकाला भेट दिली होती. भारतीय शांती सैन्य १९८७ ते १९९० या कालावधीत श्रीलंकेत तैनात होतं. यादरम्यान या दलाचे एक हजार १६९ सैनिक शहीद झाले तर तीन हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले होते. नंतर श्रीलंका सरकारने २००८ला या सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे स्मारक बनवलं.