November 11, 2024 8:31 PM November 11, 2024 8:31 PM
1
श्रीलंकेत १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक
श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार आज मध्यरात्री संपणार आहे. १९६ जागांसाठी ८ हजार ८०० हून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रधानमंत्री हरिणी अमारसुरिया, माजी प्रधानमंत्री दिनेश गुनवर्धने, विरोधी पक्षातले साजिथ प्रेमदास हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेदरम्यान १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रावर मतदान होईल. यासाठी १ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे. सुमारे ७५ हजार पोलीस सुरक्षेसाठी नियुक्त आहेत. सप्टेंबरमध्ये NPP पक्षाचे अनुरा कुमारा...