January 28, 2025 1:48 PM January 28, 2025 1:48 PM

views 9

१३ भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या नौदलाच्या अटकेत

सागरी सीमा हद्दीचा भंग केल्याप्रकरणी १३ भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलानं अटक केली. हे सर्वजण तामिळनाडूचे आहेत. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन मच्छिमार जखमी झाले असून त्यांच्यावर जाफना इथं रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मच्छीमारांना अटक झाल्यानंतर त्यांच्या गावांमध्ये प्रचंड उद्रेक झाला असून त्यांच्या सुटकेसाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केली आहे. 

November 29, 2024 1:22 PM November 29, 2024 1:22 PM

views 5

भारतीय आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त कारवाईत ५०० किलोचे अंमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाने श्रीलंकन नौदलाच्या सहकार्याने आज अरबी समुद्रात दोन मासेमारी नौकांमधून क्रिस्टल मेथ म्हणून ओळखले जाणारे सुमारे ५०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. भारतीय नौदलाने एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. या दोन्ही नौका आणि  जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत.