August 31, 2024 2:17 PM August 31, 2024 2:17 PM

views 24

कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार

श्रीलंकेत कोलंबो सुरक्षा परिषद सचिवालयाची स्थापना करण्यासाठी भारत, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे हिंदी महासागर क्षेत्रातल्या आव्हानांना तोंड देणं सोपं होणार आहे. भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर तिन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या करारावर तसंच एका निवेदनावर काल स्वाक्षऱ्या केल्या. या चारही देशांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी स्थानिक सुरक्षेला प्राधान्य देण्याचं या करारान्वये ठरवलं आहे. हे चारह...

August 23, 2024 8:08 PM August 23, 2024 8:08 PM

views 3

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त सैनिकी सराव ‘मित्र शक्ती’चा समारोप

भारत आणि श्रीलंका सैन्यदलांमधला दहावा संयुक्त  सैनिकी सराव  नुकताच पार पडला. श्रीलंकेतल्या मदुरू ओया इथल्या संरक्षण प्रशिक्षण शाळेत पार पडलेल्या या सरावसत्राला “मित्र शक्ती” असं नाव देण्यात आलं आहे. यावेळी श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे संरक्षण राज्यमंत्री प्रेमिथा बंधारा तेन्नाकुन यावेळी उपस्थित होते. त्यानंतर झा यांनी यात सहभागी झालेल्या राजपुताना रायफल्सच्या १०६ भारतीय जवानांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या गजबा रेजिमेंटने या सराव सत्रात भाग घेतला. श्रीलंका ...

July 28, 2024 7:19 PM July 28, 2024 7:19 PM

views 7

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत पराभूत

महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. स्मृती मंधानानं सर्वाधिक ६० धावा केल्या. रिचा घोषनं १४ चेंडूत ३०, तर जेनिमा रॉड्रिग्जनं १६ चेंडूत २९ धावांंचं योगदान दिलं.   भारताची गोलंदाजी मात्र निष्प्रभ ठरली. दिप्ती शर्मानं ४ षटकं टाकताना ३० धावा देत एक बळी मिळवला. तिच्या व्यतिरिक्त भारताच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला बळी मिळवत...

July 12, 2024 12:38 PM July 12, 2024 12:38 PM

views 23

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पल्लिकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर २६, २७ आणि २९ जुलैला वीस षटकांचे सामने होणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर १, ४ आणि ७ ऑगस्टला होईल. भारतीय संघ आपले नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमवेत २२ जुलैला श्रीलंकेत पोहोचेल. या सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.