November 30, 2025 8:05 PM November 30, 2025 8:05 PM

views 32

श्रीलंकेत आलेल्या दितवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १९३ वर

श्रीलंकेत आलेल्या दितवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १९३ झाली असून २०३ जण अद्याप बेपत्ता आहेत.  भारतीय लष्करानंही ऑपरेशन सागर बंधू द्वारे बचाव कार्यात भाग घेतला आहे. श्रीलंकेच्या विविध पूरग्रस्त भागात वायुदलाची एमआय -१७ ही हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.  भारतीय वायुदलानं श्रीलंकेच्या कोटमाले भागातून पूरात अडकलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या २४ जणांना तातडीनं कोलबो इथल्या रुग्णालयात पोहोचवलं. आज सकाळी श्रीलंकेच्या लष्करानंही मदतशिबीर सुरु केलं आहे. भारताच्या राष्ट्रीय...

April 6, 2025 9:35 AM April 6, 2025 9:35 AM

views 16

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेला हा 'महो-ओमानथाई' रेल्वे मार्ग श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागाला राजधानी कोलंबोशी जोडेल,ज्यामुळं प्रादेशिक संपर्क वाढून आर्थिक विकासाला चालना मिळेल. याशिवाय 'महो-अनुराधापुरा' विभागातील प्रगत रेल्वे वाहतूक नियमन प्रणालीची पायाभरणीही आज करण्यात येणार आहे.  

March 15, 2025 3:16 PM March 15, 2025 3:16 PM

views 21

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग: वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा ६ धावांनी पराभव

क्रिकेटमध्ये रायपूर इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर सहा धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे.

February 7, 2025 2:21 PM February 7, 2025 2:21 PM

views 16

श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांकडून निदर्शनं

श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या ९७ मच्छिमारांना अटक केली असून त्यांना परत आणलं पाहिजे, असा मुद्दा द्रमुक खासदार कनिमोळी यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. लोकसभेत सध्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

January 29, 2025 10:43 AM January 29, 2025 10:43 AM

views 7

श्रीलंकेनं भारतीय मच्छिमारांवर केलेल्या गोळीबाराचा भारताकडून निषेध

डेल्फ्ट बेटाजवळ 13 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध्ये दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले, तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून औपचारिकरित्या निषेध नोंदवण्यात आला. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानंही श्रीलंकेच्या सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे.

January 22, 2025 1:56 PM January 22, 2025 1:56 PM

views 14

श्रीलंका: युनायटेड नॅशनल पार्टी, समगी जना बालवेगया हे दोन्ही पक्ष स्थानिक सरकारच्या निवडणुकांसाठी एकत्र येण्यास सहमत

श्रीलंकेत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युनायटेड नॅशनल पार्टी आणि समगी जना बालवेगया या दोन्ही पक्षांनी पहिल्या फेरीत संयुक्त आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. या बैठकीनंतर आता निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी येत्या आठवड्यात या पक्षांच्या बैठका होण्याची शक्यता आहे. मार्च २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका झालेल्या नस...

December 16, 2024 10:10 AM December 16, 2024 10:10 AM

views 20

भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रमांसाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्त्वाचं – मंत्री डॉ. एस जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रम यांच्यासाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत. प्रधानमंत्री मोदी आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेमुळे हे संबंध आणखी दृढ विश्वासाचे आणि सहकार्याचे होतील असा विश्वास जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात व्यक्त केला आहे.

November 15, 2024 8:26 PM November 15, 2024 8:26 PM

views 7

श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती दिसा नायके यांच्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाला स्पष्ट बहुमत

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर या पक्षानं संसदीय निवडणुकांमध्ये पुन्हा बहुमताचा आकडा पार केला आहे. संसदेतल्या २२५ पैकी १५९ जागा या डाव्या आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळं राष्ट्रपती दिसा नायके यांना संसदेचं मजूबत पाठबळ मिळालं आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समागी जन बलवेगाया या सजित प्रेमदासा यांच्या पक्षाला ४० जागा मिळाल्या आहेत. माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या न्यू डेमॉक्रेटिक फ्रंटला केवळ ५ जागा मिळाल्या आहेत.

November 14, 2024 8:17 PM November 14, 2024 8:17 PM

views 13

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान

श्रीलंकेत संसदेच्या निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान झालं असून, आज संध्याकाळी मतमोजणीही सुरु झाली. प्रथम टपाली मतदानाची मोजणी होत असून, त्याची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होईल, तर अंतिम निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे, असं श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं सांगितलं.  या निवडणुकीत २२५ जागांसाठी ८ हजार ८०० उमेदवार रिंगणात होते.

September 30, 2024 1:42 PM September 30, 2024 1:42 PM

views 14

श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा, येत्या १४ नोव्हेंबर रोजी होणार मतदान

श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. श्रीलंकेचे मुख्य निवडणूक आयुक्त सामन श्री रत्नायके यांनी प्रसारमाध्यमांना या निवडणुकीविषयी माहिती दिली. या निवडणुकीसाठी राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी ११ अब्ज श्रीलंकन रुपयांचा निधी जारी करण्यास परवानगी दिली असून या निवडणुकीसाठी पोस्टल मतदानासाठीचे अर्ज येत्या ८ ऑक्टोबर पर्यंत स्वीकारले जातील, असं रत्नायके यांनी सांगितलं...