December 5, 2025 8:33 PM December 5, 2025 8:33 PM

views 8

HCL Squash Indian Tour: अनाहत सिंह आणि वेलवन सेंथिलकुमारला विजेतेपद

चेन्नई इथं झालेल्या एचसीएल स्क्वॉश इंडियन टूर स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिनं जोश्ना चिन्नप्पा हिच्यावर मात करून अजिंक्यपदावर नाव कोरलं. ५२ मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात अनाहत हिनं जोश्नाचा ३-२ असा पराभव केला. पुरुषांच्या विभागात भारताच्या वेलवन सेंथिलकुमार यानं इजिप्तच्या आदम हवाल याला ३-२ असं हरवून जेतेपद पटकावलं.

April 18, 2025 2:45 PM April 18, 2025 2:45 PM

views 8

स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानीचा उपांत्य फेरीत प्रवेश

मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने मलेशियाच्या सैफिक कमाल याचा ९-११, ११-६, ११-६, ११-७ असा पराभव केला. या स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात मात्र भारताच्या तन्वी खन्ना हिला उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या हेलेन तांगकडून पराभव पत्करावा लागला.

December 21, 2024 4:36 PM December 21, 2024 4:36 PM

views 8

स्क्वॉश स्पर्धेत वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार

मुंबईत सुरू असलेल्या पश्चिम भारत स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार आहे. काल उपान्त्यपूर्व फेरीत वीरने इजिप्तच्या यासीन शोहदीचा पराभव केला. महिला एकेरीच्या उपान्त्य लढतीही आज होत आहे. यात अनाहत सिंहचा सामना इजिप्तच्या नूर खफागीशी होणार आहे. आकांक्षा साळुंखेची लढत इजिप्तच्या जना स्वाइफी हिच्याशी होत आहे. उपान्त्यपूर्व फेरीत अनाहतनं अंजली सेमवाल हिला तर आकांक्षानं सेज विंग वाई हिला पराभूत केलं होतं.

November 24, 2024 6:19 PM November 24, 2024 6:19 PM

views 5

अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू  सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू  सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तिनं अंतिम फेरीत शमीना रियाझचा हीचा ११-४, ११-३, ११-१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. अनाहत हीचं मागच्या तीन महिन्यांमधलं हे पाचवं विजेतेपद आहे.

November 16, 2024 1:47 PM November 16, 2024 1:47 PM

views 4

स्क्वॅशच्या मलेशिया चषक स्पर्धेत भारताच्या अभय सिंगची उपांत्य फेरीत धडक

  क्वालालंपूर इथं स्क्वॅशच्या मलेशिया चषक स्पर्धेत भारताच्या अभय सिंगनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं वेलावन सेंथिलकुमारचा ३-१ असा पराभव केला. आज अभयची उपांत्य फेरीतली लढत  मलेशियाच्या एईन यॉव शी होईल.