June 29, 2024 3:33 PM June 29, 2024 3:33 PM

views 61

भारतीय खेळाडूंचा अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताच्या मालविका बनसोडचा महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश टेक्सास इथं सुरू असलेल्या अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या मालविका बनसोडनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत मालविकानं स्कॉटलँडची बॅडमिंटनपटू क्रिस्टी गिल्मोरचा १०-२१, २१-१५, २१-१० असा पराभव केला.   उपांत्य फेरीत मालविकाचा सामना आज रात्री जपानच्या नात्सुकी निदरियाशी होईल. पुरुष एकेरीत मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रियांशु राजावतला चीनच्या लेई लान्क्सीकडून २१-१५, ११-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा ...