February 17, 2025 9:37 AM February 17, 2025 9:37 AM

views 11

आशियाई स्क्वॉश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाला कास्यपदक

हाँगकाँग स्क्वॉश सेंटरमध्ये पार पडलेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी कास्यपदकं मिळवली आहेत. भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला, तर अनहत सिंगच्या नेतृत्वाखालील महिला संघाला यजमान हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला आशियाई कनिष्ठ सांघिक स्क्वॉश विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कांस्यपदक देण्यात येतं.   1983 मध्ये सर्वप्रथम झालेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेची ही 22 वी आवृ...

February 7, 2025 5:17 PM February 7, 2025 5:17 PM

views 7

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण,३८ रौप्य आणि ३७ कास्यपदकांचा समावेश आहे.

February 5, 2025 8:10 PM February 5, 2025 8:10 PM

views 1

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी घसरला असून मध्य प्रदेशनं १७ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्नाटक २८ सुवर्णपदकं जिंकून पहिल्या स्थानावर, तर सेना दल संघ २७ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पाचव्या स्थानावर हरयाणाचा संघ आहे. यजमान उत्तराखंडचा संघ ४ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.

January 17, 2025 1:52 PM January 17, 2025 1:52 PM

views 20

विश्वचषक खोखो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

विश्वचषक खोखो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून आपापल्या गटात दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत.   नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं काल भूतानवर ७१-३२ असा विजय मिळवला. तर महिला संघानं मलेशियावर १००-२० अशी मात केली.

January 9, 2025 1:29 PM January 9, 2025 1:29 PM

views 10

एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचापुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

  ऑकलंड इथे सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांब्री आणि फ्रेंचचा अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीने पुरुष दुहेरी प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या तिसऱ्या मानांकित ब्रिटीश जोडीचा ३-६, ६-४, १२-१० असा पराभव केला.   राजीव राम आणि ख्रिश्चन हॅरिसन या अमेरिकन जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या सॅडियो डुम्बिया आणि फॅबियन रेबोल या जोडीचा ७-५, ६-७, १०-५ असा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.  

July 15, 2024 2:57 PM July 15, 2024 2:57 PM

views 36

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्काराझ विजयी

स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि सात वेळा विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा थेट सेट्समध्ये पराभव केला.   पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्कराजला जोकोविचने टायब्रेकरपर्यंत खेचलं, पण अल्काराजने टायब्रेकर जिंकून सामनाही खिशात घातला. मिश्र दुहेरीत पोलंड आणि तैवानच्या यान जेलिन्की आणि सू वे शे या जोडीनं मेक्सिकोच्या सँतियागो गोन...

July 14, 2024 3:16 PM July 14, 2024 3:16 PM

views 22

Wimbledon Tennis Championship: नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात आज चुरशीची लढत

विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोव्हाक जोकोविच आणि विद्यमान विजेता, स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.   अल्कराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे, तर जोकोविचनं सात वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आठवेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचं ध्येय जोकोविचसमोर आज आहे. तर मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित यान...

July 14, 2024 3:10 PM July 14, 2024 3:10 PM

views 20

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई

कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत.   मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली.   भारतीय संघाचं नेतृत्व मुंबई टीडीएम प्रयोगशाळेचे प्राध्यापक शशिकुमार मेनन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉ. मयुरी रेगे, आयआयटी पवईचे डॉ. राजेश पाटकर आणि बडोदा एम. एस. ...

July 1, 2024 5:46 PM July 1, 2024 5:46 PM

views 14

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाचा सर्वसमावेशक धोरण

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. २०१८ मध्ये आलेल्या दोन शासन निर्णयांद्वारे एकंदर ३३ खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. टी-...

July 1, 2024 3:54 PM July 1, 2024 3:54 PM

views 12

टेनिस जगतातली प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा आजपासून रंगणार

हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या जगातल्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याबरोबर होणार आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलचा पुरुष एकेरीचा पहिला सामना सर्बियाच्या मियोमिर केस्मानोविक याच्याबरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचा सामना फ्रान्सच्या आद्रे मानारिनो आणि ज्योवां मेशी पेरिका या जोडी बरोबर होणार आहे...